Hon'ble Governor, Maharashtra
Hon'ble Chief Minister, Maharashtra
Hon'ble Deputy Chief Minister, Maharashtra
Hon'ble Deputy Chief Minister, Maharashtra
Hon'ble Minister of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department
राज्यातील कौशल्य विकास योजनेकरिता ही सोसायटी नोडल एजन्सी (शिखर कार्यालय) म्हणून कार्यरत असून तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण पारदर्शक स्वरूपाचे कार्यालय आहे. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडे या सोसायटीच्या समन्वयाचे कामकाज सोपविण्यात आलेले असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे ते पदसिद्ध “मुख्य कार्यकारी अधिकारी" म्हणून कामकाज पाहतात. या कार्यालयाची संस्थात्मक आणि संघटनात्मक रचना कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर असते.
कार्यकारी समिती | |
---|---|
नियामक परिषद | |
मुख्य कार्यकारी अधिकारी | |
अति.मुख्य कार्यकारी अधिकारी | |
PMKUVA | प्रशासन, आस्थापना आणि खरेदी कक्ष |
PMKVY | विधी विषयक कक्ष |
PMGKVK | वित्त, लेखा आणि लेखा परिक्षण कक्ष |
PM Vishwakarma | देखरेख व सनियंत्रण कक्ष |
ACKVK | दक्ष प्रकल्प कक्ष |
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही राज्य शासनाची कौशल्य प्रशिक्षणाविषयी राज्य स्तरावरील शिखर कार्यालय असून तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण पारदर्शक स्वरूपाची संस्था आहे. या कार्यालयाची संस्थात्मक आणि संघटनात्मक रचना कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर असते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कार्यालयामधील मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा तपशील
श्री.विजय कुमार गौतम, भा.प्र.से. | दि.१७/०१/२०११ ते दि.०३/०८/२०१५ |
श्री. विजय वाघमारे,भा.प्र.से. | दि.०३/०८/२०१५ ते दि.२५/०५/२०१७ |
श्री. ई, रवींद्रन, भा.प्र.से. | दि.२६/०५/२०१७ ते दि.२४/०९/२०१८ |
श्री.दि.दे.पवार प्रभारी मु.का.अ. (तथा अभियान समन्वयक) | दि.२४/०९/२०१८ ते दि.१४/११/२०१८ |
श्री. विरेंद्र सिंह, भा.प्र.से. | दि.१४/११/२०१८ ते दि.०४/०५/२०१९ |
श्री.अ.भि. पवार , प्रभारी आयुक्त (तथा उप आयुक्त) | दि.०४/०५/२०१९ ते दि.२९/०७/२०१९ |
श्री.दीपेंद्र सिंह कुशवाह, भा.प्र.से. | दि.२९/०७/२०१९ ते दि.०३/१०/२०२२ |
डॉ.रामास्वामी एन.,भा.प्र.से. | दि.०३/१०/२०२२ ते दि.०८/०१/२०२४ |
श्री. निधि चौधरी भा.प्र.से. | दि.०८/०१/२०२४ ते दि.२०/०८/२०२४ |
श्री. प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से. | दि.२९/०८/२०२४ पासून |
सोसायटीच्या संघटनात्मक संरचनेत महाराष्ट्रातील ६ महसूल विभाग स्तरावर विभागीय कार्यायातील अधिकारी तसेच सर्व 36 जिल्ह्यातील राज्य शासनाचे अधिकारी, (शासकीय अधिकारी, सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन पथक) आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मधील राज्याचे नेतृत्व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी,अभियान समन्वयक, प्रबंधक, वित्त अधिकारी आणि कौशल्य अभियान अधिकारी यांच्याकडून करण्यात येते.
कौशल्य विकास कार्यक्रमाकरिता केंद्रीय पोर्टल तयार करून सर्व औद्योगिक आस्थापना, त्यामधील रिक्त पदे, रोजगार जाहिरात, सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षित युवकांची माहिती एकत्रित करून राज्य तसेच, राष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी व पूर्तता यानुसार महाराष्ट्रातील युवकांना जोडणे.
कौशल्य विकास प्रशिक्षणासंबंधित संपूर्ण कामकाज उदा. प्रशिक्षण संस्था नोंदणी, उमेदवारांची नोंदणी, प्रशिक्षण तुकड्या तयार करणे, प्रशिक्षणाचे संनियंत्रण करणे, संबंधित प्रशिक्षण शुल्क अदा करणे इत्यादी सर्व बाबी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या सोसायटींच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते. हे पोर्टल राज्यांना कुशल मनुष्यबळाची आवश्यक मागणी आणि पुरवठा ट्रॅक करण्यास सक्षम करते .
या सोबतच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम खालील नमूद सोशल मिडीयावरही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
राज्य शिखर समिती | अध्यक्ष:- माननीय मुख्यमंत्री. |
---|---|
राज्य कार्यकारी समिती | अध्यक्ष:- मा. मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन. उपाध्यक्ष:- मा.प्रधान सचिव,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभाग. |
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी | कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी नोडल एजन्सी. अध्यक्ष:- मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग. |
विभागीय कौशल्य विकास समिती | कौशल्य विकास उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी. अध्यक्ष:- विभागीय आयुक्त. |
जिल्हा कौशल्य विकास समिती | कौशल्य विकास उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, अध्यक्ष :-जिल्हाधिकारी. |
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णय क्रमांक:कौविउ-२०१५/प्र.क्र.१२२/रोस्वरो-१ दिनांक २ सप्टेंबर २०१५ अन्वये मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास शिखर परिषद कार्यरत राहील. सदर शिखर परिषद कौशल्य विकासासंबंधी ध्येय धोरणे, दूरगामी उद्दिष्टे व अंमलबजावणीची संरचना ठरवेल. या परिषदेमार्फत या अभियानाचा नियतकालिकआढावा घेवून गरजेनुसार दिशानिर्देश, तसेच आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णय क्रमांक:कौविउ-२०१५/प्र.क्र.१९५/रोस्वरो-१ दिनांक ३ ऑगस्ट २०१५ अन्वये प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानासंदर्भात विविध प्रकारच्या धोरणासंबंधी निर्णय घेण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती नेमण्यात आलेली आहे.
मा. मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन हे शक्ती प्रदत्त समितीचे अध्यक्ष असून अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव, वित्त विभाग, नियोजन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग विभाग, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभाग हे या समितीचे सदस्य आहेत.तर आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे सदस्य सचिव आहेत.तसेच विषय सूचीनुसार त्या त्या विभागाचे सचिव हे निमंत्रित म्हणून बैठकीस पाचारण करण्यात येते.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिकृत मसुद्यामध्ये (MoA) नमूद मुद्दा क्र. ६ अन्वये मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या सर्वसाधारण सभेची रचना स्वीकृत करण्यात आलेली आहे.
मा. मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन हे सर्वसाधारण सभेचे पदसिद्ध अध्यक्ष असून अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हे पदसिद्ध उप अध्यक्ष आहेत.या सर्वसाधारण सभेचे मानद सदस्य म्हणून अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग विभाग, गरम विकास विभाग, कृषी विभाग, अनुसूचित जमाती कल्याण विभाग, सामजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यटन विभाग, नियोजन विभाग, कामगार विभाग, नगर विकास विभाग तसेच संचालक (प्र.) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण हे आहेत. याशिवाय या सर्वसाधारण सभेचे सदस्य म्हणून कर्मचारी संघटना / औद्योगिक संघटना यांचे ४ प्रतिनिधी तसेच सह संचालक, कौशल्य विकास आणि नाविन्यता विभागीय संचालनालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्पोरेशन, कुलगुरू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, संचालक, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, रोजगार,स्वयंरोजगार हे पदसिद्ध सदस्य आणि कौशल्य विकासामध्ये लायकी/पात्रता व अनुभव सिध्द केलेले सर्व उमेदवार हे नामनिर्देशित सदस्य असून मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी हे पदसिद्ध सदस्य सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी वार्षिक अहवाल 2023-24
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिकृत मसुद्यामध्ये (MoA) नमूद मुद्दा क्र. ५ अन्वये सोसायटी नियामक समितीची रचना स्वीकृत करण्यात आली असून ,मा.अमुस/प्र.स/स कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अति.मुकाअ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी हे समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत.
नियामक समितीचे अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हे पदसिद्ध अध्यक्ष असून मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी या समितीचे पदसिद्ध उप अध्यक्ष आहेत. या समितीचे अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव, किंवा त्याचे प्रतिनिधी उद्योग विभाग, कुलगुरू महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्पोरेशन यांचे प्रतिनिधी, अध्यक्ष भारतीय औद्योगिक संघटना यांचे प्रतिनिधी, उप अध्यक्ष, नॅशनल असोशिअशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्विस कंपनीज (NASSCOM) यांचे प्रतिनिधी, सह सचिव, कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग, उप सचिव, कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग, सह संचालक/ संचालक (अ.का.) कौशल्य विकास व नाविन्यता विभागीय संचालनालय मुंबई, संचालक, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी हे सदस्य आहेत.